सुपरस्टार रजनीकांत लवकरच झळकणार मराठी सिनेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 19:27 IST2017-11-17T19:18:23+5:302017-11-17T19:27:43+5:30
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत लवकरच मराठी सिनेसृष्टीत आपला जलवा दाखविणार आहेत. दिग्दर्शक दिपक भावे यांच्या आगामी चित्रपटात रजनीकांत आणि दाक्षिणात्य अभिनेता मामुटी दिसणार आहेत.

सुपरस्टार रजनीकांत लवकरच झळकणार मराठी सिनेमात
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत लवकरच मराठी सिनेसृष्टीत आपला जलवा दाखविणार आहेत. दिग्दर्शक दिपक भावे यांच्या आगामी चित्रपटात रजनीकांत आणि दाक्षिणात्य अभिनेता मामुटी दिसणार आहेत.
रजनीकांत यांच्या अभिनयाची छाप ही फक्त दक्षिणेकडील सिनेमात नसून बॉलिवडूनमध्येही पडली आहे. आता मराठीमध्ये पडणार आहे. मूळचे महाराष्ट्रीयन असलेले सुपरस्टार रजनीकांत यांचे कर्मभूमीसह जन्मभूमीवरही तितकच प्रेम आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक सिनेमामधून आपला अभिनय साकारला. तसेच, सिनेसृष्टीत ते सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या सिनेमाचे बजेटही मोठे असते. असे, असले तरी त्यांचा अद्याप मराठीत कोणताही सिनेमा आलेला नाही. मात्र, आता ते लवकरच मराठी सिनेसृष्टीत झळकणार आहेत.
पसायदान असे या सिनेमाचे नाव असून यामध्ये रजनीकांत आणि मामुटी यांच्या भूमिका असणार आहेत. या सिनेमाची निर्मिती बाळकृष्ण सुर्वे करत आहेत. तर दिपक भावे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. दरम्यान, जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असल्याचे निर्माते बाळकृष्ण सुर्वेंनी सांगितले आहे.
याचबरोबर, रजनीकांत सध्या 0.2 आणि काला कारिकलन सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्या या सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर मराठी सिनेमा पसायदानचे शूटिंग सुरु कऱण्यात येणार आहे.