Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा', सुजात आंबेडकर यांचं खुलं आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 16:31 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी खुलं आव्हान दिलं आहे. मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेताना सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं म्हटलं आहे.

मुंबई-

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी खुलं आव्हान दिलं आहे. मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेताना सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं म्हटलं आहे. मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीत, तर आम्ही मशिदीसमोर दुप्पट लाऊड स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू, असा इशारा काल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला होता. ते मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते. राज ठाकरेंच्या याच विधानाचा आधार घेत प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी थेट अमित ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे. 

"राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी", असं सुजात आंबेडकर म्हणाले आहेत. यासोबत राज यांच्या विधानावर जोरदार टीका सुजात यांनी केली. "माझी राजसाहेबांना विनंती आहे की तुम्ही शरद पवारांचा इंटरव्ह्यू घ्या किंवा मग स्वत: पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा. पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लीम दंगलीवर उभा करू नका", असंही सुजात आंबेडकर म्हणाले. सुजात आंबेडकरांनी दिलेल्या आव्हानावर आता अमित ठाकरे प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

टॅग्स :अमित ठाकरेमनसे गुढीपाडवा मेळावामनसेराज ठाकरेप्रकाश आंबेडकर