Join us

नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:12 IST

मागील काही दिवसांपासून नाशिकमधील उद्धवसेनेचे निलंबित वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

मागील काही दिवसांपासून नाशिकमधील उद्धवसेनेचे निलंबित वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सुधाकर बडगुजर यांचा आज मुंबई भाजपा कार्यालयात मोठ्या उत्साहात पक्ष प्रवेश झाला. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला. यावेळी बडगुजर यांच्यासह बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.  

शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांच्या मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

यावेळी बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले, मी कोविड काळात काम केले. ज्या पक्षाने माझा अनादर केला, त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीत 'दूध का दूध पानी का पानी' होईल, असा टोलाही बडगुजर यांनी ठाकरे गटाला लगावला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही केले. "दूरदृष्टी असणारा नेता आज मुख्यमंत्रि‍पदावर आहेत, त्यांच्या नेतृत्वात मी काम करणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे जी जबाबदारी मला देतील ती जबाबदारी मी पार पाडणार आहे, असंही बडगुजर म्हणाले. 

पक्षप्रवेशास भाजपामध्ये अंतर्गत होता विरोध

बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला नाशिक मधील पक्षाचे आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला माझा विरोध कायम आहे. काल मी सोशल मिडीयावर पोस्ट देखील केले होते. अशा देशद्रोही आणि बंडखोर लोकांबरोबर काम करणे अवघड आहे .आज ते प्रवेश करणार आहेत याबाबत मला काही कल्पना नाही. जे देशद्रोही आहेत , बंडखोर आहेत किंवा ज्यांनी गोळीबार केले आहेत , ते आमच्याच मतदारसंघात आहेत . अशा लोकांबरोबर एकत्र काम कसे करणार ?

टॅग्स :भाजपामहाराष्ट्रराजकारण