Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अन् अचानक एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे आमने-सामने आले; विधान भवनात नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 18:27 IST

Eknath Shinde And Uddhav Thackeray: अर्थसंकल्प सादर होत असताना उद्धव ठाकरे विधिमंडळात उपस्थित होते.

Eknath Shinde And Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावेळेस विधिमंडळात आले होते. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बाहेर जात असताना विधिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अचानक आमनेसामने आले. 

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला जात असताना समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी नमस्कार केला. एकमेकांमध्ये एक मिनिट चर्चा झाली. यानंतर पुढे जात असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. 

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे आमने-सामने आले

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने आल्यावर दोघांनीही एकमेकांकडे पाहिलेही नाही आणि पुढे निघून गेले. यावेळी दोघेही जलदगतीने एकमेकांच्या बाजूने जात असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा खांदा एकमेकांना लागला असता. 

दरम्यान, काही महिन्यांआधी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या सभागृहाच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला होता. त्यांच्या निरोप समारंभाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येत फोटोसेशन केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Eknath Shinde and Uddhav Thackeray face-off; What happened in Vidhan Bhavan?

Web Summary : Eknath Shinde and Uddhav Thackeray came face to face in Vidhan Bhavan during the budget session. They ignored each other after a brief encounter, marking a tense moment.
टॅग्स :विधान भवनएकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना