भुयारी मेट्रो वेगाने धावणार, विधानभवन स्थानकाच्या साच्याचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 03:14 AM2020-09-03T03:14:34+5:302020-09-03T03:16:16+5:30

विधानभवन स्थानकाचा विचार करता ७५.४ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. स्थानकावरून रोज ७५ हजारपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतील.

The subway Metro will run at high speed, the work of the mold of the Vidhan Bhavan station has been completed | भुयारी मेट्रो वेगाने धावणार, विधानभवन स्थानकाच्या साच्याचे काम पूर्ण

भुयारी मेट्रो वेगाने धावणार, विधानभवन स्थानकाच्या साच्याचे काम पूर्ण

Next

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे काम वेगाने सुरु असून, बुधवारी मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे विधानभवन मेट्रो स्थानकाच्या साच्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. विधानभवन स्थानकाचा विचार करता ७५.४ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. स्थानकावरून रोज ७५ हजारपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतील.
पॅकेज १अंतर्गत हुतात्मा चौक, चर्चगेट आणि कफ परेड स्थानकांची कामे वेगात सुरू आहेत. हे पूर्ण झालेले बांधकाम पॅकेज १च्या अंतर्गत
आहे. यात तळाचा स्लॅब, मॅझेनाईन स्लॅब, कॉनकोर्स स्लॅब आणि छताचा स्लॅब या कामांचा समावेश आहे. विधानभवन स्थानकाचे बांधकाम कट आणि कव्हर या आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. या स्थानकात प्रवाशांसाठी सात प्रवेश-निकसद्वारांची सुविधा आहे. दरम्यान, एमआयडीसी मेट्रो स्थानकाचे अशा प्रकारचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

विधानभवन स्थानकाद्वारे मंत्रालय, विधानभवन, नवीन प्रशासकीय इमारत जोडले जातील. मुंबई मेट्रो ३ मार्गिकेवरील विधानभवन स्थानकात चाकरमान्यांची वर्दळ अधिक प्रमाणात असेल.
- रणजित सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, एमएमआरसी

विधानभवन स्थानकाचा विचार करता ७५.४ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. स्थानकावरून रोज ७५ हजारपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतील.

Web Title: The subway Metro will run at high speed, the work of the mold of the Vidhan Bhavan station has been completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.