येत्या वर्षात पूर्ण होणार मेट्रोचे भुयारीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 12:41 AM2019-12-29T00:41:07+5:302019-12-29T00:41:22+5:30

मेट्रो-३ मार्गिकेचे आतापर्यंत झाले ७३ टक्के भुयारीकरण पूर्ण

Suburbanization will be completed in the coming year | येत्या वर्षात पूर्ण होणार मेट्रोचे भुयारीकरण

येत्या वर्षात पूर्ण होणार मेट्रोचे भुयारीकरण

googlenewsNext

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पासाठी २०१९ हे सरते वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरले. तर आगामी २०२० सालामध्येदेखील अनेक महत्त्वाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यात येणार असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने (एमएमआरसीएल) सांगण्यात आले. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे येत्या वर्षात सप्टेंबरमध्ये मेट्रो-३ प्रकल्पाचे शंभर टक्के भुयारीकरण पूर्ण होणार असल्याचेही एमएमआरसीएलच्या वतीने सांगण्यात आले.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या कामाला आता गती आली असून आत्तापर्यंत ७३ टक्क्यांपेक्षा जास्त भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो-३ ची पहिली मेट्रो डिसेंबर २०२० मध्ये मुंबईमध्ये दाखल होणार आहे. तसेच काळबादेवी गिरगाव येथील प्रकल्पग्रस्तांचे ते राहत असलेल्या ठिकाणीच पुनर्विकास होणार असून के-३ या पहिल्या पुनर्विकास इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट जानेवारी २०२० मध्ये व जी-३ इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट मे २०२० मध्ये देण्यात येणार आहे. मेट्रो-३ मार्गिकेचे संचलन आणि देखभाल कामाच्या निविदा फेब्रुवारी २०२० मध्ये मागविण्यात येतील. तर जायकाच्या कर्जाचा तिसरा टप्पा मार्च २०२० पर्यंत येणे अपेक्षित आहे.

तसेच पुढल्या वर्षी मुख्य मार्गासाठी रूळ टाकण्याचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. मेट्रो-३ ची स्थापत्य कामे ७० टक्के पूर्ण होतील, कट अ‍ॅण्ड कव्हर स्थानकांची जमीन पुनर्स्थापित करण्याचे काम तसेच स्थानकांना अंतिम रूप देण्याची कामे प्रगतिपथावर असतील. यासह विविध प्रणालींच्या कामात आरेखन काम पूर्ण होऊन उपकंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

आरे, धारावी येथील वीजपुरवठा केंद्र
टाटा पॉवर आणि एमएमआरसीएलदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार आरे आणि धारावी येथील वीजपुरवठा केंद्र कार्यरत होणे अपेक्षित आहे. काही स्थानकांमध्ये पूरक इमारतीचे बांधकाम प्रगतिपथावर असेल. तर स्थापत्य कामासोबतच भुयारे आणि स्थानकांमधील विद्युत आणि यांत्रिकी कामे तसेच अग्निशमन यंत्रणेची कामे प्रगतिपथावर असतील, असेही एमएमआरसीच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Suburbanization will be completed in the coming year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो