Subodh Bhave wants to make 'Sharad Pawar', will a movie be made in the future? | सुबोध भावेला बनायचंय 'शरद पवार', भविष्यात चित्रपट येणार?

सुबोध भावेला बनायचंय 'शरद पवार', भविष्यात चित्रपट येणार?

मुंबई - देशातील अनेक महापुरुषांचे चरित्रपट 70 मिमिच्या पडद्यावर झळकवणाऱ्या सुबोध भावेला देशातील मोठ्या नेत्याची भूमिका साकारयची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात शरद पवारांची भूमिका साकारायची असल्याची इच्छा सुबोध भावेने व्यक्त केलीय. 

हिंदी चित्रपटातील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारली होती. ठाकरे चित्रपटात सिद्दीकी यांचा लुक हुबेहुब बाळासाहेब ठाकरेंसारखाच दिसून येत होता. या लूकची चांगलीच चर्चा रंगली होती, तर कौतुकही करण्यात आले होते. आता, बाळासाहेब ठाकरेंनंतर महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या नेत्यावर चित्रपट बनविण्यात येईल, असे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अभिनेता सुबोध भावेने शरद पवारांची भूमिका साकारण्यास उत्सुक असल्याचं म्हटलंय.

संवेदनशील व सामाजिकदृष्ट्या सजग भान असलेले अभिनेते, लेखक, दिग्दर्शक म्हणून सुबोधची ओळख आहे. सुबोधने यापूर्वी, मराठी चित्रपटात लोकमान्य टिळक, डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं मोठ्या प्रमाणात कौतुकही करण्याचत आलंय. आता, शरद पवारांची भूमिका साकारण्याची इच्छा त्याने खुद्द शरद पवार यांच्यापुढेच बोलून दाखवली.  
''शरद पवार यांची भूमिका साकारण्याची इच्छा सुबोधने याआधीच व्यक्त केली आहे. सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल,'' असे सुबोध भावेने म्हटले. पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी सुबोधने शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळी, आपल्या भावना व्यक्त केल्या. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Subodh Bhave wants to make 'Sharad Pawar', will a movie be made in the future?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.