'ते' पोलीस अधिकारी अखेर निलंबित!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 09:46 AM2020-03-03T09:46:57+5:302020-03-03T09:54:56+5:30

नवनिर्वाचित पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर हे निर्देश देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

sub-inspector Gahininath Satav of the Mahim police station suspended SSS | 'ते' पोलीस अधिकारी अखेर निलंबित!

'ते' पोलीस अधिकारी अखेर निलंबित!

googlenewsNext
ठळक मुद्देमाहिम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ गोरख सातव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.हरविलेल्या मुलाची चौकशी करण्यास आलेल्या फिर्यादीच्या श्रीमुखात भडकविणे त्यांना भोवले.सातव यांच्यावर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. 

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई - माहिम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ गोरख सातव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हरविलेल्या मुलाबाबत चौकशी करण्यास आलेल्या फिर्यादीच्या श्रीमुखात भडकविणे त्यांना चांगलेच भोवले आहे. नवनिर्वाचित पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर हे निर्देश देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

माहिम पोलीस ठाण्यात अंमलदार कक्षात गणेश जळगावकर हे नदीम शेख नामक तरुण आणि त्याच्या भावासह शिरले. एका हरवलेल्या मुलाबाबत त्यांना चौकशी करायची होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावकर आणि पोलीस उपनिरीक्षक सातव यांच्यात वाद झाले. त्यातच त्यांनी जळगावकर यांच्या श्रीमुखात लगावली. त्यामुळे जळगावकर यांचे डोके मागच्या बाजूने खुर्ची आणि टेबलाला आपटून ते जखमी झाले. त्यानुसार याप्रकरणी सातव आणि जळगावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सातव यांच्यावर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. 

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : ...म्हणून मार्क झुकेरबर्ग यांनी मोदींसाठी बदलला होता आपला प्रोफाईल फोटो

Narendra Modi: 'या' कारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सोशल मीडियाला रामराम, रविवारपासून सर्व अकाउंट्स बंद करण्याचा विचार

भारतात कोरोनाचे पाच रुग्ण; दिल्ली, तेलंगणा व राजस्थानात तिघांना लागण

द्वेष करणे सोडा, सोशल मीडिया नको - राहुल गांधी

 

Web Title: sub-inspector Gahininath Satav of the Mahim police station suspended SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.