मराठी शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता मिळणार, १० वर्षांत ९६ शाळा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:31 IST2026-02-26T16:30:20+5:302026-02-26T16:31:07+5:30

महापालिकेच्या मराठी शाळा टिकाव्यात तसेच पटसंख्या वाढवावी, यासाठी विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता देण्याचा प्रस्ताव विचारधीन

Students will get attendance allowance to maintain Marathi schools 96 schools less in 10 years | मराठी शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता मिळणार, १० वर्षांत ९६ शाळा कमी

मराठी शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता मिळणार, १० वर्षांत ९६ शाळा कमी

मुंबई

महापालिकेच्या मराठीशाळा टिकाव्यात तसेच पटसंख्या वाढवावी, यासाठी विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता देण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे, अशी माहिती शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांनी मंगळवारी माध्यमांना दिली. 

शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त यांनी शिक्षण समितीसमोर सादर केल्यानंतर त्या माध्यमांशी संवाद साधत होत्या. पालिकेच्या न्यू माहीम रोड येथील शाळेची इमारत धोकादायक घोषीत झाल्यानंतर ती शाळा बंद करण्यात आली. तसेच पालिकेच्या मराठी शाळा बंद होत असल्याने विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राकडून सातत्याने करण्यात येत होता. 

१० वर्षांत ९६ शाळा कमी
पालिकेकडून जानेवारी २०२६ मध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे मागील १० वर्षांत पालिकेच्या ९६ मराठी शाळा कमी झाल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. पालिकेतील मराठी शाळांची संख्या आणि मराठी विद्यार्थ्यांची घटती संख्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता देण्याचा प्रस्ताव प्रशासनासमोर मांडण्यात येणार असल्याचे शिरवाडकर यांनी सांगितले. याशिवाय नवीन उपायही केले जाणार आहेत. त्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पीय सूचनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रशासनाला लवकरच पाठवला जाईल, असेही त्यांनी लोकमतला सांगितले.

Web Title : मराठी स्कूलों को बचाने के लिए उपस्थिति भत्ता; 10 वर्षों में 96 स्कूल बंद।

Web Summary : मुंबई महानगरपालिका मराठी स्कूलों में नामांकन बढ़ाने के लिए उपस्थिति भत्ता पर विचार कर रही है, एक दशक में 96 स्कूल बंद होने के बाद। प्रस्ताव का उद्देश्य छात्रों की घटती संख्या को संबोधित करना और शहर में मराठी शिक्षा को पुनर्जीवित करना है।

Web Title : Attendance allowance to save Marathi schools; 96 schools closed in 10 years.

Web Summary : Mumbai's municipal corporation considers attendance allowance to boost Marathi school enrollment, following the closure of 96 schools in a decade. The proposal aims to address declining student numbers and revitalize Marathi education in the city, alongside other new initiatives.