Students will be able to select the college for the second phase of FCFS today | विद्यार्थी एफसीएफएसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज करू शकणार महाविद्यालयाची निवड

विद्यार्थी एफसीएफएसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज करू शकणार महाविद्यालयाची निवड

मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेची प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य फेरी (एफसीएफएस) सुरू असून यातील पहिल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया गुरुवारी संपली. आता दुस-या प्रकारच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी महाविद्यालय निवडण्याची संधी मिळणार आहे. एफसीएफएसच्या दुसºया प्रकारातील प्रवेशासाठी एकूण १ लाख ४ हजार ६६६ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये कला शाखेच्या १४,५८६, वाणिज्यच्या ४६,७३४, विज्ञान शाखेच्या ४०,७७४ तर एमसीव्हीसीच्या २,५७२ जागांचा समावेश आहे. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य (प्रकार १) फेरीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी २१ आॅगस्ट रोजी कनिष्ठ महाविद्यालयाची निवड केली होती त्यांना २१ आॅगस्ट ते २२ आॅगस्ट दुपारी १ वाजेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करायचे होते. या फेरीमध्ये ५३१ विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांची निवड केली होती,

सुधारित एफसीएफएस वेळापत्रक
२२ आॅगस्ट - दुसºया प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांच्या रिक्त जागा जाहीर होणार.
२३ आॅगस्ट - स. १० ते सायं. ५ पर्यंत विद्यार्थी एफसीएफएस पॅनलद्वारे कनिष्ठ महाविद्यालय निवडू शकतील.
२३ व २६ आॅगस्ट - सकाळी १० ते सायंकाळी ५ आणि २६ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत - विद्यार्थ्यांनी एफसीएफएसमध्ये पॅनलद्वारे मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चिती करणे.
२६ आॅगस्ट - तिसºया प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांच्या रिक्त जागा जाहीर होणार.
२७ आॅगस्ट - सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत - तिसºया प्रकारातील विद्यार्थी एफसीएफएस पॅनलद्वारे कनिष्ठ महाविद्यालय निवडू शकतील.
२७ व २८ आॅगस्ट - सकाळी १० ते ५ आणि २८ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत - एफसीएफएसमध्ये पॅनलद्वारे मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चिती करणे.
२८ आॅगस्ट - सायं. ५ वा. - रिक्त जागांचा तपशील आॅनलाईन जाहीर होणार.

एफसीएफएस (प्रकार २) साठी उपलब्ध जागा : कला - १४,५८६, वाणिज्य - ४६,७३४, विज्ञान - ४०,७७४, एमसीव्हीसी - २,५७२, एकूण - १,०४,६६६.
कोट्याच्या रिक्त
जागा : इनहाउस - ५,२६५, अल्पसंख्याक - १४,२८६, व्यवस्थापन - ८,३२२, एकूण - २८,४१३.

Web Title: Students will be able to select the college for the second phase of FCFS today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.