Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 14:49 IST2025-09-06T14:46:45+5:302025-09-06T14:49:05+5:30
मुंबईतील विविध खासगी शाळांमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील विविध खासगी शाळांमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक शाळांमध्ये विद्यार्थीच शिक्षक झाले होते. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी खास कार्यक्रम सादर केले. शिक्षण उपसंचालकांनी शिक्षक दिनी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कांदिवली येथील अवर लेडी ऑफ रेमेडी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका आणि ॲनी जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात सहभागी झालेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व भाषणाद्वारे सादर केले.
दुसरीकडे, शिक्षिका लिशा पॉन्ड्स आणि सोनिया अलोझ यांनीही आपापल्या शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विज्ञान आणि गणिताचे शिक्षक जेरार्ड अँटनी यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. ऑडिओ व्हिज्युअल रूममधून हा कार्यक्रम सर्व वर्गांमध्ये थेट प्रक्षेपित करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी बनविले ग्रीटिंग कार्ड
विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेली ग्रीटिंग कार्ड्स शिक्षकांना दिली. तसेच गाणी, नृत्य, कविता वाचन आणि भाषण सादर करून शिक्षकांप्रति आदर व्यक्त केला. अशा प्रकारे शिक्षक दिन विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरल्याचे मुख्याध्यापिका ऍनी जॉर्ज यांनी सांगितले.
या शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
चेंबूर येथील एफएसीस्कूल, वांद्रे उपनगरात चेतना कॉलेज, काळाचौकी येथील अभ्युदय शाळा, तर गोवंडी येथील एकवीरा विद्यालय आणि रघुवीर विद्यालय, कांदिवली याशिवायशेकडो खासगी अनुदानित वविना अनुदानित शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.