Join us

विकसित भारत बिल्डाथॉन स्पर्धा; विद्यार्थ्यांनो, नवीन कल्पना सांगा; एक कोटी रुपये जिंका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:02 IST

सहावी ते बारावीपर्यंतच्या मुलांसाठी विकसित भारत बिल्डाथॉन स्पर्धा 

मुंबई : विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांना भरारी देता येणार आहे. त्यांच्यातील कौशल्य आणि गुणांना वाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने विकसित भारत बिल्डाथॉन ही स्पर्धा सुरू केली आहे.  या स्पर्धेत एक कोटीपर्यंतची बक्षिसे जिंकता येणार आहे. सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आहे.

समस्येवर सूचवा उपायआपल्या परिसरातील एखाद्या सामाजिक, तांत्रिक, शैक्षणिक अथवा पर्यावरणीय समस्येवर उपाय सूचवा.  उदा. स्वच्छ ऊर्जा वापरासाठी उपाययोजना, पाणी बचत व व्यवस्थापन, शालेय विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण साधने, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणारे उपाय, ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती कल्पना.

बक्षिसे व फायदे असे...राष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि सन्मान. प्रमाणपत्रे दिली जातील. विजेत्या विद्यार्थ्यांना पुढील इनोव्हेशन प्रकल्पांसाठी मार्गदर्शन आणि शिष्यवृत्तीच्या संधी.

कोण सहभागी ? > ६वी ते १२वीपर्यंतचे विद्यार्थी.> एकटे किंवा गटात सहभागी होता येते.> प्रत्येक टीमसोबत शाळेतील एक शिक्षक मार्गदर्शक असेल.

स्पर्धेचे वेळापत्रक...> नोंदणी मुदत : ६ ऑक्टोबरपर्यंत> लाइव्ह समकालीन नवकल्पना > इव्हेंट १३ ऑक्टोबरला > अंतिम सादरीकरण १३ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान> मूल्यांकन प्रक्रिया १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान > एकूण एक हजार विजेत्यांची निवड होणार.

नोंदणी प्रक्रिया अशी...innovateindia.mygov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल

English
हिंदी सारांश
Web Title : Vikshit Bharat Buildathon: Students, share ideas, win ₹1 crore!

Web Summary : Students can win up to ₹1 crore in the Vikshit Bharat Buildathon. The competition encourages students (6th-12th) to propose solutions for social, technical, or environmental problems. Registration closes on October 6th. Top ideas win recognition and scholarships.
टॅग्स :विद्यार्थीशिक्षण