भाजपाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अनोळखी शिरला; ठार मारण्याची धमकी दिल्याने कांजुरमध्ये तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 00:19 IST2019-10-13T00:19:19+5:302019-10-13T00:19:43+5:30
विक्रोली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अनोळखी व्यक्ती सहभागी झाला आणि गोंधळ उडाला आहे.

भाजपाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अनोळखी शिरला; ठार मारण्याची धमकी दिल्याने कांजुरमध्ये तणाव
मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराला जोर चढला आहे. यामुळे सोशल मिडीयावरही जो तो प्रचार करताना दिसत आहे. विक्रोळीतील भाजपाच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक अनोळखी जॉईन झाला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विक्रोली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अनोळखी व्यक्ती सहभागी झाला आणि गोंधळ उडाला आहे. ग्रुपमध्ये भाईगिरीची भाषा केल्याने भाजप पदाधिकारी विश्वास घाग यांनी त्याला हटकले. याच रागात संबंधित व्यक्तीने शिविगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने भाजप पदाधिकारी कांजुर पोलीस ठाण्यात पोहचले आहेत.
त्यामुळे कांजुर परिसरात तणावाचे वातावरण आहे. यात बंदूकीचा धाकात धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.