‘वंदे भारत’वर वर्षभरात ७४१ वेळा दगडफेक; आत्तापर्यंत ११४० जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 06:26 IST2025-01-31T06:25:39+5:302025-01-31T06:26:05+5:30
वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकीच्या घटनांमुळे त्यांच्या दुरुस्तीच्या कामावर कोट्यवधी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे.

‘वंदे भारत’वर वर्षभरात ७४१ वेळा दगडफेक; आत्तापर्यंत ११४० जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या वर्षभरात दररोज सरासरी ११ रेल्वेंवर दगड फेकल्याच्या घटना घडल्या असून, एकूण ३९०१ घटनांची नोंद झाली आहे. या घटनांमध्ये आत्तापर्यंत ११४० जणांना अटक झाली असून, त्यांच्यावर कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे सुरक्षा संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, मध्य रेल्वेवर दगडफेकीच्या ३९०१ घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक केल्याप्रकरणी ७४१ गुन्हे दाखल झाले आहेत. यात २२८ जणांना अटक करण्यात आली. वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकीच्या घटनांमुळे त्यांच्या दुरुस्तीच्या कामावर कोट्यवधी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे.
उपाययोजना
दगडफेकीच्या संभाव्य ठिकाणी आरसीसी सुरक्षा भिंत उभारणे.
एफसी गेट, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर आणि ऑटोमॅटिक क्लोजिंग डोअर रॅक सुविधा.
सर्व ट्रेनला लोकलप्रमाणे जाळीच्या खिडक्या इतर प्रवासी गाड्यांमध्येही बसवणे.
अशी असते शिक्षा
रेल्वे कायद्याच्या कलम १५२ अन्वये रेल्वेवर दगडफेक केल्यास शिक्षेची तरतूद आहे. यात १० वर्षांपर्यंत जन्मठेप किंवा तुरुंगवासाची तरतूद आहे. तथापि, रेल्वे कायद्याच्या कलम १५३ मध्ये सुधारणा करून दगडफेक करणाऱ्यांवर दंड आकारणे आणि नुकसानभरपाई घेतली जाते.