मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 08:00 IST2025-11-15T08:00:02+5:302025-11-15T08:00:24+5:30
Winter in Mumbai: राज्यातील बहुसंख्य शहरात तापमानाचा पारा घसरला असून, मुंबईचे शुक्रवारी किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शनिवार, रविवार आणि सोमवारी हा पारा १६ ते १७ अंशांवर उतरण्याची शक्यता आहे.

मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
मुंबई - राज्यातील बहुसंख्य शहरात तापमानाचा पारा घसरला असून, मुंबईचे शुक्रवारी किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. शनिवार, रविवार आणि सोमवारी हा पारा १६ ते १७ अंशांवर उतरण्याची शक्यता आहे. यामुळे गारेगार झालेल्या मुंबईकरांना बोचरी थंडी अनुभवता येणार आहे. मुंबई शेजारचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानचे किमान तापमान १८ नोंदविण्यात आले.
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले, शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १८.४ नोंदविण्यात आले. १४ ते २० नोव्हेंबर आणि २१ ते २७ नोव्हेंबर या दोन आठवड्यांत महाराष्ट्र व मध्य भारतातील बहुतेक भागात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले, हिमालयासोबतच उत्तर भारताकडून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यामुळे राज्य गारठले आहे.
किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
ठाणे २१.४
मुंबई १८.४
माथेरान १८
डहाणू १७.६
सांगली १५.६
सोलापूर १५.६
सातारा १४.४
छ.संभाजीनगर १३.१
महाबळेश्वर १२.९
अहिल्यानगर ११.४
मालेगाव ११.२
बीड ११
नाशिक १०.९
जळगाव ९.५
सोमवारपर्यंत गारठा टिकून राहणार असून, किमान तापमान १६ ते १७ अंश नोंदविले जाईल. शुक्रवारी नोंदविण्यात आलेले मुंबईचे किमान तापमान थंडीच्या हंगामातील आतापर्यंतचे निचांकी किमान तापमान आहे.