सरकारी कर्मचाऱ्यांचा २0 ऑगस्टला राज्यव्यापी लाक्षणिक संप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 01:20 IST2019-07-16T01:20:39+5:302019-07-16T01:20:50+5:30

शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी २0 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप करणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस आणि समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली.

Statemental emblem of State employees on 20th August | सरकारी कर्मचाऱ्यांचा २0 ऑगस्टला राज्यव्यापी लाक्षणिक संप

सरकारी कर्मचाऱ्यांचा २0 ऑगस्टला राज्यव्यापी लाक्षणिक संप

मुंबई : विविध मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी २0 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप करणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस आणि समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली.
अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी ३ जुलै रोजी राज्यव्यापी लक्षवेध दिन पाळला होता तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर जोरदार निदर्शने केली होती. मात्र त्याला राज्य सरकारने प्रतिसाद न दिल्याने आपल्या संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी राज्यव्यापी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय संघटनेच्या कार्यकारिणीच्या नुकत्याच नाशिक येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही संघटना १९ लाख राज्य सरकारी, निम सरकारी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वय समितीचे नेतृत्व करते.

Web Title: Statemental emblem of State employees on 20th August