Join us
Daily Top 2Weekly Top 5

"राज्य इगोसाठी नाही, जनतेसाठी चालवायचं", आरे कारशेडच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 16:21 IST

आरे कारशेडच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

मुंबई - मुंबई मेट्रो३ प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाल्यापासून गाजत असलेल्या आरे कारशेडचे काम बंद करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असून, कारशेड पहाडी गोरेगाव येथे स्थलांतरीत करण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान, आरे कारशेडच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.विधानसभेत आरेमधील कारशेडचे काम बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरेची जागा उच्च न्यायालय, ग्रीन टेब्युनल, सुप्रीम कोर्ट मान्यता मिळाल्यानंतर निश्चित झाली होती.त्यानंतर तिथे काम सुरू झालं. डेपो, बाउंड्री वॉल, बिल्डिंग, अंडरपास तयार केला आणि पॅकेज सेव्हन त्याचा टनेल सगळं काम केलंय. आता ही कारशेड रद्द झाल्यानंतर या कामाचे पैसे कोण देणार. कसे वसूल होणार या कामाचे पैसे. ज्या ठिकाणी मेट्रोचं काम बंद ठेवल्यामुळे दर दिवशी पाच कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

आता मेट्रोची कारशेड पहाडी गोरेगाव येथे स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्यासाठी डीपीआर तयार झाला आहे का? आरेची जागा सरकारची जागा, पहाडी गोरेगावची जागा विकत घ्यावी लागणार. त्याचा परिणाम तिकिटांच्या किमतीवर येणार आहे. त्यामुळे ही मेट्रो किफायतशीर राहणार नाही. त्यामुळे नम्र विनंती करतो पुनर्विचार करावा.. कारशेड आहे त्याच ठिकाणी ठेवून ही लाईन पूर्ण करण्याचं काम करावं. असा टोला फडणवीस यांनी लगावला.

यावेळी गाजत असलेल्या मुंबई पोलिसांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी राज्याचा गृहमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत मला पूर्ण कल्पना आहे. मात्र कधी कधी राजकीय हितसंबधांचा प्रभाव पोलिसांच्या कामगिरीवर होतो. आता पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याबाबत म्हणाल तर या सभागृहामध्येही अनेकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही काळापूर्वी कल्याणच्या सभेत राज्यातील पोलीस हे भांडी घासायच्या लायकीचे आहेत, असे विधान केले होते. भूमिका बदलल्या की आपण कसे बदलतो याचं हे एक उदाहरण आहे. चर्चा करायची असेल, विषयांतर, विषय बदलायचे असतील तर ते कसं काय बदलता येतात हे आपण बघितलं आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता

टॅग्स :मेट्रोदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विकास आघाडी