राज्य सरकारकडून छठपूजेच्या मार्गदर्शक सूचना जारी, जाणून घ्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 15:26 IST2020-11-19T15:22:36+5:302020-11-19T15:26:06+5:30
उतर भारतीयाच छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. छठपूजेसाठी राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्य सरकारकडून छठपूजेच्या मार्गदर्शक सूचना जारी, जाणून घ्या...
मुंबई
कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीच्या उतर भारतीयाच छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. त्या अनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी आल्या आहेत. त्याचे पालन करण्याचं आवाहन देशमुख यांनी केलं आहे.
काय आहेत मार्गदर्शक सूचना?
१) कोरोनाचा संसर्ग वाढू नये यादृष्टीने नागरीकांनी तलाव, समुद्राकाठी एकत्रित न येता गर्दी टाळावी. व घरीच थांबून साध्या पद्धतीनेच छठपूजा साजरी करावी.
२) महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता सुरक्षा व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
3) छठपूजा उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत. तसेच कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. फटाक्यांची आतिषबाजी व ध्वनीक्षेपणास बंदी असेल.
४) उत्तर भारतीय नागरीकांनी छठपूजेदरम्यान मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे तसेच जेष्ठ नागरीक व लहान मुलांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणू नये, यासंबंधी आयोजकांनी जनजागृती करावी.