State Government employee teachers terminated strike | राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांचा संप स्थगित
राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांचा संप स्थगित

मुंबई : सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणातील काही भागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर २० आॅगस्ट २०१९ रोजी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीचा एक दिवसीय लाक्षणिक संप स्थगित करण्यात आला आहे.
राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीने २० आॅगस्टलासंपाची घोषणा केली होती. राज्य पूरस्थितीत असताना शासनाला आपल्या मागण्यांसाठी अडवून ठेवणे योग्य नाही. अशावेळी सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसोबत शिक्षक संघटनांनीही पूरग्रस्त भागात मदतकार्य करायला यायला हवे, अशी भूमिका समन्वय समितीने घेतल्याची माहिती विश्वास काटक यांनी दिली.


Web Title: State Government employee teachers terminated strike
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.