मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या तयारीला आतापासूनच सुरवात करा - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:34 IST2025-09-17T18:27:56+5:302025-09-17T18:34:13+5:30

शिंदे सेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक संपन्न...

Start preparing for Mumbai Municipal Corporation elections now says Eknath Shinde | मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या तयारीला आतापासूनच सुरवात करा - एकनाथ शिंदे

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या तयारीला आतापासूनच सुरवात करा - एकनाथ शिंदे


मुंबई-आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या तयारीला आता पासूनच सुरवात करा असे आवाहन शिंदे सेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री केले.शिंदे सेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक नरिमन पॉईंट येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात संपन्न झाली. 

या बैठकीला शिंदे सेनेतील ६५ माजी नगरसेवक तसेच माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार निलेश राणे,  सचिव राम रेपाळे, सचिव संजय मोरे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना मार्गदर्शन केले.तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी ही माझी असून पालिकेत
महायुतीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शिंदे सेनेच्या आमदारांनी पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या कामात हस्तक्षेप करु नये,तश्या त्यांच्या तक्रारी माझ्या पर्यंत येवू देवू नका अश्या सूचना त्यांनी केल्या. शिंदे सेनेच्या माध्यमातून मुंबईत केलेली कामे मतदारांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन त्यांनी केले.
 

Web Title: Start preparing for Mumbai Municipal Corporation elections now says Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.