बोरिवलीच्या पंजाबी लेन येथे कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करा: आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:14 PM2020-03-29T18:14:40+5:302020-03-29T18:14:44+5:30

उत्तर मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरिक स्लममध्ये राहतात.

Start Corona Separation Room at Punjabi Lane, Borivali: Commissioner | बोरिवलीच्या पंजाबी लेन येथे कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करा: आयुक्त

बोरिवलीच्या पंजाबी लेन येथे कोरोना विलगीकरण कक्ष सुरू करा: आयुक्त

googlenewsNext

मुंबई--पालिकेच्या बोरिवली पश्चिमेच्या पंजाबी लेन येथील सुुुमारे ४०००० चौफूट जागेत ५० बेडचे कोरोना अलगिकरण कक्ष सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काल आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक पालिका आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे यांना दिले. येथील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील जागेत आठ दिवसात खाटा व योग्य सामुग्री उभारून अलगिकरण कक्ष सुरू करा असे आदेश आयुक्तांनी दिले.

 पालिका आयुक्तांनी काल येथील जागेला भेट दिली.यावेळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी,आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस,पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार,आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक पालिका आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे,विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.त्यानंतर त्यांनी बोरिवलीच्या भगवती व शताब्दी हॉस्पिटलला देखिल भेट दिली.

उत्तर मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरिक स्लममध्ये राहतात.त्यामुळे कोरोनाची चाचणी आणि अलगिकरणासाठी त्यांना मुंबईत कस्तुरबा आणि अन्य ठिकाणी जावे लागते.त्यामुळे येथे कोरोना अलगिकरण कक्ष लवकर सुरू करा अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी,आमदार विलास पोतनीस यांनी पालिका आयुक्तांना केली.भगवती येथील कोरोना बाधीत रुग्णांवर या कक्षात उपचार करावेत अश्या सूचना देखिल आयुक्तांनी दिल्या.

Web Title: Start Corona Separation Room at Punjabi Lane, Borivali: Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.