मल्हार बाय द बे! संगीत, सांस्कृतिक वैविध्य आणि जल्लोषाने सजलेली संस्मरणीय संगीतसंध्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:45 IST2025-08-08T16:45:00+5:302025-08-08T16:45:30+5:30

Malhar by the Bay : मल्हार २०२५ची झलक दाखवणारी ‘मल्हार बाय द बे’ ही संगीतसंध्या ५ ऑगस्टला लोअर परळच्या अँटीसोशल येथे पार पाडली. ३०० हून अधिक प्रेक्षकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

St Xavier's Mumbai’s annual festival Malhar by the Bay dance, music and art collide | मल्हार बाय द बे! संगीत, सांस्कृतिक वैविध्य आणि जल्लोषाने सजलेली संस्मरणीय संगीतसंध्या

मल्हार बाय द बे! संगीत, सांस्कृतिक वैविध्य आणि जल्लोषाने सजलेली संस्मरणीय संगीतसंध्या

कॉलेज फेस्टिव्हलची तयारी आता सर्वत्र जोरदार सुरू झाली आहे. विद्यार्थी आवर्जून याची वाट पाहत असतात. तरुणाचा सळसळता उत्साह सर्वांचच लक्ष वेधून घेतो. सेंट झेवियर्स कॉलेजच्या प्रसिद्ध 'मल्हार' फेस्टिव्हलची नेहमीच जोरदार चर्चा रंगते. मल्हार २०२५ची झलक दाखवणारी ‘मल्हार बाय द बे’ ही संगीतसंध्या ५ ऑगस्टला लोअर परळच्या अँटीसोशल येथे पार पाडली. ३०० हून अधिक प्रेक्षकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वातावरणात एक खास उत्साह होता. मंचावर विविध कॉलेजमधनू आलेल्या कलाकारांच्या जोशपूर्ण ड्युओ परफॉर्मन्सने आणि बँडच्या  हटके सादरीकरणांनी संध्याकाळ रंगतदार बनली.

युनिव्हर्सल म्युझिक इंडियाचे कलाकार हे यावर्षीच्या संगीतसंध्याचे खास आकर्षण ठरले. उत्सवी ज्हा, समद खान, भरत आणि मोहम्मद फैज़ यांनी सादर केलेल्या "देखा तैनू" या गाण्याने सर्वजण मंत्रमुग्ध झाले. सुंदर आवाज आणि जबरदस्त सादरीकरणामुळे लोक भारावून गेले. शेवटचा टप्पा अर्थातच धमाकेदार डीजेनाईटचा होता, जिथे सगळ्यांनी आनंदाने थिरकण्याचा पुरेपूर आनंद लुटला.

फक्त संगीतच नव्हे तर कॉलेजच्या संघटनेने दाखवलेली प्रगल्भता, व्यवस्थापन कौशल्य आणि सर्जनशीलता यावेळी ठळकपणे जाणवली. सॅम हे मल्हार २०२५ चे प्रमुख प्रायोजक आहेत. या कार्यकर्मात त्यांच्या उपस्थितीने एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली. जिओ सावन आणि फुटार्डोज म्युझिक सहप्रायोजक म्हणून सहभागी झाले होते. ज्यांनी या संध्याकाळला आत्मीयता आणि कलात्मकतेचा सुंदर मिलाफ दिला.

ही संध्याकाळ केवळ एक सांगीतिक अनभुव नव्हता तर मल्हार २०२५ च्या जादूची एक झलक होती. या "ट्रेलर"नंतर आता पुढे स्पर्धा, कला, मजा-मस्ती आणि ग्लॅमर यांनी भरलेली एक मेजवानी तुमची वाट पाहत आहे. १४, १५ आणि १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात उत्सवाची खरी झलक पाहायला मिळणार आहे. म्हणून तयारीला लागा, कारण मल्हारचा रंग आता चढू लागलाय!
 

Web Title: St Xavier's Mumbai’s annual festival Malhar by the Bay dance, music and art collide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.