तिकीट दरांतील सवलतीमुळे एसटीची १५७ कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:07 IST2025-01-30T13:06:14+5:302025-01-30T13:07:00+5:30
७५ कोटी प्रवाशांनी घेतला विविध योजनांचा लाभ.

तिकीट दरांतील सवलतीमुळे एसटीची १५७ कोटींची कमाई
महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटीच्या तिकीट दर सवलतींचा ७५ कोटी ६० लाख ५९ हजार प्रवाशांनी लाभ घेतला आहे. यातून एसटीला १५७ कोटी ६६ लाख ४६ हजारांचे उत्पन्न एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत मिळाले आहे.
एसटी प्रवाशांना विविध सवलती देण्यात येत आहेत. यामध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला, पत्रकार, अपंग, सैनिक, खेळाडू अशा सुमारे ३१ घटकांना सवलती दिल्या जातात.
२०२२ मध्ये शासनानेदेखील काही सवलती वाढविल्या असून, त्यांचादेखील प्रवाशांना लाभ मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच एसटीच्या प्रवाशांना सवलती देऊनही एसटीला फारसा तोटा होत नसून, उलट प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
२०२३-२४ आर्थिक वर्षात सवलतींचे लाभार्थी
सवलतीचे लाभार्थी
९३ कोटी १४ लाख ९८ हजार
सवलतीतून उत्पन्न
२०३ कोटी ८ लाख ४७ हजार
एकूण सरासरी वार्षिक उत्पन्न
९ हजार ९७८ कोटी ४७ लाख ४७ हजार
डिसेंबरपर्यंतचे लाभार्थी
सवलतीचे लाभार्थी
७५ कोटी ६० लाख ५९ हजार
सवलतीतून उत्पन्न
१५७ कोटी ६६ लाख ४६ हजार
एकूण सरासरी वार्षिक उत्पन्न
५ हजार ७७८ कोटी ८४ लाख ४२ हजार
कोणाला किती सवलत?
अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के, बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ६६ टक्के, तर मुलींना १०० टक्के तिकीट दरात सवलत दिली जात आहे.