अमृत ज्येष्ठ नागरिक अन् महिला सन्मान योजनेतंर्गत एसटीने कमविले २२१२ कोटी

By नितीन जगताप | Published: December 3, 2023 03:10 PM2023-12-03T15:10:42+5:302023-12-03T15:11:00+5:30

शासनाच्या सवलतीचा एसटीला आधार

ST earned 2212 crores under Amrit Jyeshtha Nagarika and Mahila Samman Yojana | अमृत ज्येष्ठ नागरिक अन् महिला सन्मान योजनेतंर्गत एसटीने कमविले २२१२ कोटी

अमृत ज्येष्ठ नागरिक अन् महिला सन्मान योजनेतंर्गत एसटीने कमविले २२१२ कोटी

मुंबई : अमृत ज्येष्ठ नागरिक व महिला सन्मान योजनेतंर्गत एसटीने कमविले २२१२ कोटी, ८८ लाख कमावले आहे. शासनाच्या सवलतीमुळे एसटीला आधार मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्यातील ७५ वर्षे पूर्ण झालेला ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या एसटी बसेस मधून मोफत प्रवासाची घोषणा केली.  त्यानुसार २६ ऑगस्ट २०२२ पासून ही योजना एसटीने प्रत्यक्ष राबवण्यास सुरुवात केली. गेल्या एक वर्षांमध्ये या योजना लाभ २१ कोटी, २६ लाख, ४३ हजार लाभार्थींना मिळाला आहे. या योजनेतून प्रतिपूर्ती रक्कम म्हणून एसटीला आतापर्यंत १०९२ कोटी, ३७ लाख रुपये शासनाकडून मिळाले आहेत.

तसेच सन. २०२३-२४ चा अर्थसंकल्प मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून तिकीट दर ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली त्यानुसार १७ मार्च २०२३ पासून. एसटीने महिला सन्मान योजना नावाने महिलांना एसटीच्या तिकीट दर मध्ये ५०  टक्के सवलत देण्यास सुरुवात केली .आतापर्यंत सुमारे ४२ कोटी २५ लाख ६२ हजार इतक्या लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्रतिकृती रक्कम म्हणून शासनाने एसटी महामंडळाला तब्बल १११९ कोटी ५८ लाख रुपये दिले आहेत.

Web Title: ST earned 2212 crores under Amrit Jyeshtha Nagarika and Mahila Samman Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.