विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 02:28 IST2025-05-08T02:28:01+5:302025-05-08T02:28:10+5:30

एस. टी. महामंडळाच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठीकीत ते बोलत होते. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कामगार आयुक्त तथा महामंडळाचे संचालक ह. पि. तुम्मोड, संचालक डॉ. सुमंत देऊलकर आदी बैठकीला उपस्थित होते. 

ST bus drivers without accidents will be rewarded; Transport Minister Pratap Sarnaik informed | विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्षातील २६० दिवस तसेच पाच, दहा, पंधरा, वीस वर्षे विनाअपघात सेवा बजावणाऱ्या बसचालकांचा १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे या राष्ट्रीय सणाच्या दिवशी रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येईल. जितकी वर्ष विना अपघात सेवा बजावतील तितक्याच रोख रकमेने त्यांचा सन्मान करण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी बुधवारी केली.

एस. टी. महामंडळाच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठीकीत ते बोलत होते. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कामगार आयुक्त तथा महामंडळाचे संचालक ह. पि. तुम्मोड, संचालक डॉ. सुमंत देऊलकर आदी बैठकीला उपस्थित होते. 

गेली ७७ वर्षे अपघाताचे अल्प प्रमाण आणि किफायतशीर सेवेमुळे एस.टी.ने प्रवाशांच्या मनात विश्वासार्हता निर्माण केली आहे. भविष्यात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा गौरव केल्यास ते जबाबदारीने प्रवासी वाहतूक 
करतील, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. 

२०४ बसस्थानकांवर एटीएम सुविधा
राज्यातील २०४ बसस्थानकांवर एटीएम केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याची निविदा लवकरच काढण्यात येणार असून राष्ट्रीयकृत तसेच अन्य बँकांची एटीएम सुविधा उपलब्ध होणार आहे. 
नव्या तीन हजार बस खरेदी करण्याची निवेदक प्रक्रियेला मान्यता दिली आहे. पूर्वीप्रमाणेच ३ बाय २ प्रकारची आसन व्यवस्था या बसमध्ये असणार आहेत. 
त्यामुळे सध्याच्या क्षमतेपेक्षा आणखी १५ ते १७ प्रवासी नव्या बसमध्ये बसून प्रवास करतील, असे मंत्री सरनाईक म्हणाले.

महामंडळ लवकरच 
१०० मिडी बस घेणार

नव्या बस खरेदीत १०० मिडी बस घेण्यात येणार आहेत. जिथे लालपरी पोहोचू शकत नाही, अशा डोंगराळ, दुर्गम भागामध्ये या मिडी बस चालवण्यात येणार आहेत. 
यामुळे दुर्गम भागातील आदिवासी पाड्यापर्यंत बससेवा पुरवण्यात महामंडळ सक्षम होईल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Web Title: ST bus drivers without accidents will be rewarded; Transport Minister Pratap Sarnaik informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.