सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 18:47 IST2022-07-16T18:47:16+5:302022-07-16T18:47:45+5:30
Multispecialty Hospital In Sawantwadi: सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर उभे रहावे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
मुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जनतेची सोय होणार असून तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल. हॉस्पिटल लवकरात लवकर उभे रहावे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
सिंधुदुर्ग आणि नांदेड जिल्ह्यातील विविध प्रश्नांसदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यासह इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आंबोली (चौकुळ) व गेळे येथील कबुलायतदार गावकर सदरातील जमिनीच्या वाटपाबाबत, मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रासाठी आंबोली, ता. सावंतवाडी येथील जागा देण्याबाबत, आंबोली येथील एम.टी.डी.सी.च्या ताब्यातील पायाभूत सुविधा असलेली इमारत हॉस्पिस्टॅलिटी मॅनेजमेंट कोर्सेस चालविण्याकरिता मुंबई विद्यापीठाला मिळणेबाबत तसेच वेंगुर्ला येथे सिंधु स्वाध्यायसाठी मुंबई विद्यापीठाला जागा मिळणेबाबत चर्चा करण्यात आली.