लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने रात्रकालीन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण आणि पनवेल यादरम्यान धिम्या मार्गावर २० नोव्हेंबर रोजी पहाटे आणि मध्यरात्री उशिरा या गाड्या सोडण्यात येणार आहेत. निवडणूक कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना देखील या सेवांचा फायदा होणार आहे.
विशेष लाेकलचे वेळापत्रक- २० नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता सुटणाऱ्या गाड्या- डाऊन मार्गावर सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल.- अप मार्गावर कल्याण-सीएसएमटी, पनवेल -सीएसएमटी
२० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री उशिरा सुटणाऱ्या गाड्या
डाऊन मार्गावरसीएसएमटी - कल्याण : १:१०, २:३०.सीएसएमटी - पनवेल : १:४०, २:५०.
अप मार्गावरकल्याण - सीएसएमटी : १:००, २:००.पनवेल -सीएसएमटी : १.००, २:३०.