Join us

नवरात्रोत्सवासाठी मेट्रोची विशेष सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 09:08 IST

शुक्रवार ते  सोमवार या कालावधीत मेट्रो मार्ग २ अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७ च्या गुंदवली या स्थानकांवरून शेवटची मेट्रो ही १२:२० वाजता सोडण्यात येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  नवरात्र उत्सवादरम्यान मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ या मेट्रो मार्गांवर अतिरिक्त सेवा सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी लाखो नागरिक घराबाहेर पडतात. या काळात  त्यांना रात्रीच्या वेळी प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्याच्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवार ते  सोमवार या कालावधीत मेट्रो मार्ग २ अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७ च्या गुंदवली या स्थानकांवरून शेवटची मेट्रो ही १२:२० वाजता सोडण्यात येणार आहे. 

अशी असेल ही मेट्रोची अतिरिक्त सेवाशुक्रवारपासून ते २३ ऑक्टोबर या कालावधीत सुमारे १५ मिनिटांच्या अंतराने एकूण १४ अतिरिक्त सेवांचा समावेश. सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या कालावधीत सुमारे २५३ इतक्या सेवा या साडेसात ते साडे दहा  मिनिटांच्या अंतराने. शनिवारी २३८ आणि रविवार २०५ इतक्या सेवा या ८ ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने तर १५ मिनिटांच्या अंतराने १४ अतिरिक्त सेवा असतील. अतिरिक्त सेवांच्या कालावधीत गुंदवली या स्थानकावर शेवटची मेट्रो ही रात्री ०१:३० वाजता पोहोचेल. 

टॅग्स :मेट्रोनवरात्री