Join us

भाविकांसाठी ‘बेस्ट’ची विशेष सेवा; महालक्ष्मी दर्शनासाठी जाणाऱ्यांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 08:25 IST

या उत्सव काळात उपनगरातून तसेच भायखळा, महालक्ष्मी रेल्वेस्थानक येथून महालक्ष्मी मंदिराकडे जाण्याकरिता १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत विशेष २६ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

मुंबई : नवरात्रोत्सवात मुंबईतील महालक्ष्मी देवस्थानच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दीत असते. महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने पुढाकार घेतला आहे. 

या उत्सव काळात उपनगरातून तसेच भायखळा, महालक्ष्मी रेल्वेस्थानक येथून महालक्ष्मी मंदिराकडे जाण्याकरिता १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत विशेष २६ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच आवश्यकतेप्रमाणे शहराच्या विविध भागांमधून महालक्ष्मी मंदिराकडे येणाऱ्या बसेसच्या संख्यांमध्येही वाढ करण्यात येणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले आहे.

विशेष बसफेऱ्या शिवडी येथून महालक्ष्मी मंदिरात जाण्याकरिता गर्दीच्या वेळी लालबाग, चिंचपोकळी व महालक्ष्मी रेल्वेस्थानक मार्गे नवरात्रोत्सवात विशेष बससेवा चालविण्यात येतील. 

या मार्गांवर धावणार अतिरिक्त गाड्या - ३७ : जे. मेहता मार्गपासून कुर्ला पश्चिमपर्यंत - ५७ : वाळकेश्वरपासून प्रा. ठाकरे उद्यान (शिवडी) - १५१ : वडाळा आगार ते महालक्ष्मी - ए६३ : भायखळा (प) ते जे. मेहता मार्ग - ए७७ : भायखळा (प) ते ब्रीच कँडी रुग्णालय - ए७७ ज्यादा : संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) ते  ब्रीच कँडी रुग्णालय - ८३ : कुलाबा बसस्थानक ते सांताक्रूझ आगार - ए ३५७ : मुंबई सेंट्रल आगार ते शिवाजीनगर आगार - विशेष : कस्तुरबा गांधी चौक (सी. पी. टँक) ते ब्रीच कँडी रुग्णालय विशेष - प्र. ठाकरे उद्यान (शिवडी) ते महालक्ष्मी मंदिर 

टॅग्स :बेस्टप्रवासीनवरात्री