Join us

उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 07:04 IST

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळला.

मुंबई :  माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्तता करावी, यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळला.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये दंडाधिकारी न्यायालयाने ठाकरे आणि राऊत यांचा अर्ज फेटाळला. या निर्णयाला त्यांनी विशेष न्यायालयात धाव घेतली. सेनेच्या मुखपत्रात बदनामी करण्यात आली, असा दावा करत शेवाळे यांनी ठाकरे आणि राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला. संबंधित लेख विधानसभेत झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासातील चर्चेचा परिणाम असल्याचे अर्जात म्हटले होते.

टॅग्स :उद्धव ठाकरेराहुल शेवाळेसंजय राऊत