Join us

'स्पा'च्या आड वेश्या व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकून चार मुलींची केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 19:47 IST

गोल्डन सिटी कॉम्प्लेक्स मधील पहिल्या मजल्यावर गेल्या कित्येक दिवसापासून टोरर्स स्पा मध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात होता.

ठळक मुद्देगोल्डन सिटी कॉम्प्लेक्स मधील पहिल्या मजल्यावर गेल्या कित्येक दिवसापासून टोरर्स स्पा मध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात होता.

मीरारोड - मीरारोडच्या जीसीसी क्लब जवळ टोरर्स स्पा वर पोलिसांनी छापा टाकून तेथील वेश्याव्यवसाय उघडकीस आणला आहे . पोलिसांनी चार पीडित मुलींची सुटका करून एका आरोपीस अटक केली आहे .      गोल्डन सिटी कॉम्प्लेक्स मधील पहिल्या मजल्यावर गेल्या कित्येक दिवसापासून टोरर्स स्पा मध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात होता. पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश भामरे व इतर कर्मचारी यांनी सापळा रचला . बोगस गिऱ्हाईक पाठवून खात्री पटताच धाड टाकून तोरोस अब्राहम मगरदीचीयन (३२) या आरोपीस अटक केली .  मुलींच्या आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता .

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसमीरा रोड