Sonu Nigam: मुंबई आयुक्तांच्या चुलत भावाकडून सोनू निगमला धमकी, स्क्रीनशॉट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 16:01 IST2022-02-24T15:49:55+5:302022-02-24T16:01:53+5:30
सोन निगम हा बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक आहे. सोनूचे देश-विदेशात चाहते आहेत. त्यामुळेच, परदेशातही त्यांच्या गाण्याचे अनेक शो होत असतात

Sonu Nigam: मुंबई आयुक्तांच्या चुलत भावाकडून सोनू निगमला धमकी, स्क्रीनशॉट व्हायरल
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त सोन निगम आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांच्या चुलत भावामध्ये तू तू मै मै झाल्याची घटना समोर आली आहे. चहल यांच्या चुलत भावाने सोनू निगला धमकी दिल्याचं कथितपणे सांगण्यात येत आहे. राजिंदर सिंह असे या व्यक्तीचे नाव असून विदेशात गाण्याच्या एका शोसाठी त्यांनी सोनू निमगसोबत संपर्क साधला होता. त्यानंतर, दोघांमध्ये खटके उडाल्याची चर्चा आहे.
सोन निगम हा बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक आहे. सोनूचे देश-विदेशात चाहते आहेत. त्यामुळेच, परदेशातही त्यांच्या गाण्याचे अनेक शो होत असतात. मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्त इकबालसिंह चहल यांनी त्यांचा चुलत भाऊ राजिंदर सिंह याची सोनू सूदसोबत भेट घडवून दिली होती. त्यानंतर, राजिंदर यांनी सोनूला एक म्युझिक कॉन्सर्ट विदेशात करण्यासाठी संपर्क केला. मात्र, सोनूच्या परदेशातील कार्यक्रमाचं सर्वकाम त्याचे प्रमोटर रॉकी हेच पाहतात. त्यामुळे, सोनूने राजिंदरला रॉकीसोबत संपर्क करण्यास सांगितले.
सोनूचं हे वागणं राजिंदरला वाईट वाटलं, त्यातून त्यांनी सोनूला धमकी दिली. व्हॉट्सअपवर अनेक मेसेज सोनूला पाठविण्यात आले, त्यातच हा धमकीचाही मेसेज असल्याचे समजते. या मेसेजेसचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. मात्र, सोनूने याबाबत कुठलिही तक्रार दिली नाही, किंवा देऊ इच्छित नाही. कारण, इकबालसिंह यांनी मुंबईत केलेल्या कामाचा आपण आदर करतो, असे सोनूचे म्हणणे आहे.