Join us

'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप

By संतोष कनमुसे | Updated: October 15, 2025 14:32 IST

राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असो त्यांच्या वेबसाईट बाहेरुन कोण चालवतंय, असा संशय आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

"सकाळी सगळ्या वृत्तवाहिन्यांवर मतदार याद्यांची बातमी दाखवता. त्यावर पुरावे समोर येतात. दुपारी ती नावे निवडणूक आयोगाच्या वेसाईटवर असतात पण, सायंकाळी सहा वाजता ती नावे गायब होतात. राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरं कोणतरी चालवतो', असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केला. 

आज विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाला भेट दिली. यावेळी त्यांनी मतदार याद्यांतील घोळाबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी केली. यावेळी पत्रकार परिषदेत आमदार जयंत पाटील यांनी गंभीर आरोप केले. 

“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली

"निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दुसरा कोणीतरी परस्पर नाव घालतो. मतदार याद्या उघड झाल्या की नाव काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असो यांच्या हातात काही नाही. कोणीतरी बाहेरच या वेबसाईट या सिस्टीम अपडेट करतंय, असा याचा अर्थ आहे. काल चीफ इलेक्शन कमिशन यांना भेटलो. त्यांना आम्ही एक निवेदन दिले. यामध्ये त्यांना आ्ही अनंत चुका दाखवल्या, त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला म्हणणे पाठवतो असे सांगितले, असंही जयंत पाटील म्हणाले. 

राज ठाकरेंचा ECवर निशाणा

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मतदार हा गोपनीय कसा असेल, तुम्ही याद्या जाहीर करता. मतदान गोपनीय असते. निवडणूक आयोगाचा घोळ काही कळत नाही. २०२२ च्या याद्या नाव आणि फोटोंसह आहेत आणि आताच्या याद्यांमध्ये फोटो काढून टाकले आहेत. हे सगळे निवडणूक आयोग करत आहे आणि ते हे का करत आहेत, अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली. 

दोन याद्या राज ठाकरे यांनी दाखवल्या

मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो आणि बुधवारी पुन्हा राज्यासह केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोग हे फक्त निवडणुका घेतात, कंडक्ट करतात. परंतु, राजकीय पक्ष प्रत्यक्ष निवडणुका लढवतात. परंतु, निवडणूक आयोग राजकीय पक्षांना मतदार याद्या दाखवतच नसतील, तर पहिलाच घोळ इकडे आहे. आम्ही तुम्हाला याद्याच दाखवणार नाहीत, असे सांगत २०२४ च्या निवडणुका व्हायच्या आधी आणि नंतर अशा दोन याद्या राज ठाकरे यांनी दाखवल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Election Commission website controlled externally, Jayant Patil alleges serious manipulation.

Web Summary : Jayant Patil alleges external control of the Election Commission's website, manipulating voter lists. He claims names disappear mysteriously. Raj Thackeray questions voter list discrepancies, highlighting missing photos. Leaders met with the Election Commission to address these issues and demand postponement of local elections.
टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसनिवडणूक 2024