मच्छीमारांच्या समस्या सोडवणार
By Admin | Updated: February 17, 2015 01:02 IST2015-02-17T01:02:30+5:302015-02-17T01:02:30+5:30
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कोळी समाजाच्या विविध मागण्या सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विविध मच्छीमार संघटनांची शिखर संघटना असलेल्या कोळी महासंघाला दिले आहे.
मच्छीमारांच्या समस्या सोडवणार
मुंबई : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कोळी समाजाच्या विविध मागण्या सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विविध मच्छीमार संघटनांची शिखर संघटना असलेल्या कोळी महासंघाला दिले आहे.
कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाबरोबर सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. शिवाय त्यांना मच्छीमार समाजाच्या समस्यांबाबत निवेदन दिले. या संदर्भात लवकरच शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती पाटील यांनी दिली. आघाडी सरकारच्या कार्यकाळात मच्छीमारांच्या मागण्यांबाबत दादर टीटी ते चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानापर्यंत कोळी बांधवांचा लाँगमार्च काढण्यात आला होता. त्यावेळी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष म्हणून आमचे सरकार सत्तेवर आल्यावर समस्या निश्चित सोडवल्या जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. (प्रतिनिधी)
च्ऐरोलीतील १११ हेक्टर कांदळवनावर शासनाच्या नियोजित सागरी संवर्धन केंद्रामुळे आणि खाडीकिनाऱ्यांच्या विकासामुळे मच्छीमारांच्या रोजीरोटीवर परिणाम होणार आहे.
च्सुमारे दीड कोटीची ही योजना कार्यान्वित होणार असून प्रथम येथील मच्छीमारांशी चर्चा करण्यात यावी.
च्पर्यावरणच्या रक्षणात मोलाची भूमिका बजावणारे कांदळवन उद्ध्वस्त होणार असल्यामुळे येथील सागरी जैविक वैविधतेवर परिणाम होणार आहे.
च्सागरी संवर्धन केंद्रामुळे मच्छीमार उद्ध्वस्त होणार असून, सुमारे ५०० मच्छीमार कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.