सूर्यग्रहणावर ढगांचे सावट नाही; मुंबईकरांना ग्रहण पाहण्यास मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 06:57 PM2020-06-20T18:57:08+5:302020-06-20T18:57:54+5:30

रविवारी होणारे सूर्यग्रहण मुंबईकरांना पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे.

Solar eclipses are not cloudless; Mumbaikars are likely to see the eclipse | सूर्यग्रहणावर ढगांचे सावट नाही; मुंबईकरांना ग्रहण पाहण्यास मिळण्याची शक्यता

सूर्यग्रहणावर ढगांचे सावट नाही; मुंबईकरांना ग्रहण पाहण्यास मिळण्याची शक्यता

Next


मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील आकाश रविवारी सामान्यत: ढगाळ राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. परिणामी रविवारी होणारे सूर्यग्रहण मुंबईकरांना पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. सध्या सर्वत्र पावसाळी आणि ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे रविवारी होणारे सूर्यग्रहण मुंबईकरांना पाहण्यास मिळेल की नाही? याबाबत सांशकता व्यक्त केली जात होती. मात्र हवामान खात्याने रविवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहिल्याने सूर्यग्रहण पाहता येईल, असे म्हटले आहे.

मुंबईतून सकाळी १० वाजून १ मिनिटांनी खंडग्रास सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी ग्रहणमध्य असल्याने सूर्यबिंब जास्तीत जास्त सुमारे ७० टक्के ग्रासित दिसेल. दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. २६ डिसेंबर २०१९ रोजी सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातून दिसली होती. त्यावेळीही उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते. आता भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा योग २१ मे २०३१ रोजी येणार आहे. त्या ग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातून दिसणार आहे. महाराष्ट्रातून सूर्यग्रहणाची  कंकणाकृती अवस्था दिसण्याचा योग मात्र खूप उशीरा म्हणजे ३ नोव्हेंबर २४०४ रोजी आहे.

....................................

रविवारी कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा व उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे. तर उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. कुरूक्षेत्रावरून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसणार आहे.  

....................................

- २१ जून रोजी सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होईल.
- दुपारी १२ वाजून १ मिनिटांपासून १२ वाजून २ मिनिटांपर्यंत या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसेल.
- दुपारी १ वाजून ४८ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल.

....................................

Web Title: Solar eclipses are not cloudless; Mumbaikars are likely to see the eclipse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.