Solapur: सरकारी नोकरावर हल्ला करणारा अजय मैंदर्गीकर सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातून तडीपार
By विलास जळकोटकर | Updated: March 14, 2024 20:02 IST2024-03-14T20:02:02+5:302024-03-14T20:02:30+5:30
Solapur News: सरकारी नोकरांवर हल्ला करणाऱ्या तसेच जातीय तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करणाऱ्या अजय मैंदर्गीकर (वय- २६, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, सलापूर) याची सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पोलीस आयुक्तालयाकडून गुरुवारी बजावण्यात आला.

Solapur: सरकारी नोकरावर हल्ला करणारा अजय मैंदर्गीकर सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातून तडीपार
- विलास जळकोटकर
सोलापूर - सरकारी नोकरांवर हल्ला करणाऱ्या तसेच जातीय तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करणाऱ्या अजय मैंदर्गीकर (वय- २६, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, सलापूर) याची सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश पोलीस आयुक्तालयाकडून गुरुवारी बजावण्यात आला. नमूद अजय मैंदर्गीकर याने शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याबरोबरच इतरांच्या जिवितास धोका निर्माण करणारी कृत्ये केल्याबद्दल त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय दोन समाजामध्ये जातीय तेढ निम)र्ण होईल, अशी वक्तव्ये करुन कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचे काम केल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात ॲक्शन घेतली आहे.
त्याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (१अ), (ब) अन्वये हद्दपारचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना सादर करण्यात आला होता.या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्तांनी कार्यवाही करुन अजयची दोन वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश बजावला. त्याला वडवली पोलीस ठाणे, ठाणे शहर येथे सोडण्यात आले. पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.