सोशल मीडियावरील फ्रेंडने ५ लाखांना फसवले, एअर इंडियाच्या हवाई सुंदरीचे खाते केले रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:39 IST2025-03-17T11:39:03+5:302025-03-17T11:39:13+5:30

याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे...

Social media friend cheats 5 lakhs, Air India's air beauty's account emptied | सोशल मीडियावरील फ्रेंडने ५ लाखांना फसवले, एअर इंडियाच्या हवाई सुंदरीचे खाते केले रिकामे

सोशल मीडियावरील फ्रेंडने ५ लाखांना फसवले, एअर इंडियाच्या हवाई सुंदरीचे खाते केले रिकामे

मुंबई : सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारून तिच्याशी मैत्री करणे पवईतील हवाई सुंदरीला भलतेच महागात पडले. हवाई सुंदरीला ब्लॅकमेल करत  निशांत सिंह ऊर्फ आरव कपूर नावाच्या व्यक्तीने पाच लाख ६२ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

ही २६ वर्षीय तक्रारदार तरुणी एअर इंडियात नोकरी करते. गेल्या वर्षी ९ ऑगस्टला तिला स्नॅपचॅटवर आरव कपूर नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यांच्यात संवाद सुरू झाला. त्याने आपण चंडीगड येथे वास्तव्यास आहे आणि आपला मोठा व्यवसाय आहे, असे सांगितले. आई-वडिलांचे अपघातात निधन झाल्याने आपण एकटेच राहतो, असेही त्याने तिला सांगितले. 

‘निशानही मीच, आरवही मीच’
दोघांनीही हरयाणात भेटण्याचे ठरवले. त्यानुसार ही तरुणी २ फेब्रुवारीला त्याला हरयाणाला भेटली असता त्याने आपले नाव निशान सिंह असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आरव कपूर नावाने सोशल मीडिया खात्यावरून तिच्याशी संवाद साधल्याची कबुलीही दिली; पण त्याने पैसे परत करण्यास नकार दिला. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने हवाई सुंदरीने पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

वेगवेगळ्या नावांनी खाती
दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताच आरवने अश्लील फोटो पाठविण्याचा आग्रह तिच्याकडे धरला. 

त्याच्या बोलण्याला बळी पडून तिने आपले फोटो पाठविले. त्यानंतर याच फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल करत तो तिच्याकडून पैसे उकळू लागला. त्याने तिच्याकडून ५ लाख ९० हजार रुपये उकळले. 

तक्रारदार तरुणीने त्याचे प्रोफाईल गुगलवर शोधले असता तो वेगवेगळ्या नावांनी सोशल मीडियावर खाती चालवत असल्याचे तिच्या निदर्शनास आले.

Web Title: Social media friend cheats 5 lakhs, Air India's air beauty's account emptied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.