... म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली, मनसेकडून स्पष्टीकरण

By महेश गलांडे | Published: February 27, 2021 07:40 PM2021-02-27T19:40:39+5:302021-02-27T19:41:37+5:30

उदयनराजे भोसलेंनी गेल्या काही दिवसांपासून अनेक नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही भेट घेतली होती.

... So Udayan Raje bhosale met Raj Thackeray, explanation from MNS by twitter | ... म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली, मनसेकडून स्पष्टीकरण

... म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली, मनसेकडून स्पष्टीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देउदयनराजे भोसलेंनी गेल्या काही दिवसांपासून अनेक नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही भेट घेतली होती.

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा (BJP) खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) हे मुंबईत 'कृष्णकुंज'वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या भेटीला आले होते. उदयनराजेंच्या राजभेटीनंतर सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या. मात्र, मनसेकडून या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलंय. मनसेच्या ट्विटर अकाऊंटवरुन कृष्णकुंजवरील भेटीचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत. 

उदयनराजे भोसलेंनी गेल्या काही दिवसांपासून अनेक नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसेच, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fhadnavis) यांनाही उदयनराजे मराठा आरक्षणासंदर्भात भेटले होते. त्यानंतर आज सायंकाळी 6.00 वाजता उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली.  


उदयनराजे भोसले यांनी कौटुंबिक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटी दरम्यान उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरेंना राजमुद्रा भेट दिली. उदयनराजे हे पहिल्यांदाच कृष्णकुंजवर आल्याने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सन्मान केला, अशी माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आलीय.

दरम्यान, उदयनराजे यांची कृष्णकुंजवर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्याशी भेट होत असल्यानं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यात, आज मराठी भाषा दिनाच्या दिवशी ही भेट होत आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणासंदर्भातच ही भेट होत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, राजभेटीच मनसेनं स्पष्टीकरण दिल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
 

Web Title: ... So Udayan Raje bhosale met Raj Thackeray, explanation from MNS by twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.