... म्हणून मुंबईचा धोका वाढतोय, फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 21:08 IST2020-07-25T21:07:15+5:302020-07-25T21:08:06+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्ली, मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना चाचणी अहवालांच्या प्रति यापूर्वी शेअर केल्या होत्या.

... म्हणून मुंबईचा धोका वाढतोय, फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
मुंबई - महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यातील कोरोना चाचण्या वाढविण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यापूर्वीही फडणवीस यांनी राज्यात आणि मुंबईत कोरोना चाचण्या तुलनेनं कमी होत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्याना पत्र लिहिले होते. त्यानंतर, आज पुन्हा एकदा मुबईचा धोका वाढत असून चाचण्यांची कमतरता हेच कारण असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्ली, मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना चाचणी अहवालांच्या प्रति यापूर्वी शेअर केल्या होत्या. महाराष्ट्र आणि दिल्लीतील कोरोना चाचण्यांचा तुलनात्मक लेखाजोखाही फडणवीस यांनी मांडला होता. मुंबईत संसर्गाचा दर 21 ते 27 टक्क्यांवर स्थिरावलेला आहे. त्यातच, चाचण्यांची संख्या अतिशय कमी. 1 ते 19 जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी केवळ 5500 चाचण्या दररोज होत आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोनाबळींची संख्या दररोज सरासरी तेवढीच असल्याचा निष्कर्ष फडणवीस यांनी मांडला होता. त्या तुलनेत दिल्लीत कोरोना आटोक्यात येत असल्याचंही ते म्हणाले होते. आता पुन्हा एकदा चाचण्यांच्या कमतरतेकडे त्यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.
मुंबईत सातत्याने कमी चाचण्या होत असल्यामुळे मुंबईचा धोका वाढतो आहे. मृत्यूदर वाढला आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 25, 2020
चाचण्या वाढविल्याशिवाय या संकटावर मात करणे अवघड. मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरेजी यांना पत्र. @CMOMaharashtrapic.twitter.com/0C4xjT03bg
मुंबईत सातत्याने कमी चाचण्या होत असल्यामुळे मुंबईचा धोका वाढतो आहे, त्यामुळेच मृत्यूदर वाढला असून चाचण्या वाढविल्याशिवाय या संकटावर मात करणे अवघड, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून चाचण्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे.