राज्यात आतापर्यंत १ कोटी ९७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:06 AM2021-05-16T04:06:05+5:302021-05-16T04:06:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात दिवसभरात १ लाख ५० हार ९२५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण ...

So far more than 1 crore 97 lakh beneficiaries have been vaccinated in the state | राज्यात आतापर्यंत १ कोटी ९७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

राज्यात आतापर्यंत १ कोटी ९७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात दिवसभरात १ लाख ५० हार ९२५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण १ कोटी ९७ लाख ३० हजार ४३९ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

राज्यात आतापर्यंत ११ लाख ४३ हजार ९६९ आराेग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, ७ लाख ४ हजार ९७१ आराेग्य कर्मचाऱ्यांना दुसऱा डोस देण्यात आला. १५ लाख ७६ हजार ३७७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ७ लाख १५ हजार ८२७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ४० हजार ९२२ जणांना लस देण्यात आली. एकूण १ कोटी २२ लाख ३३ हजार ३१७ जणांना लसीचा पहिला डोस, तर २७ लाख १५ हजार ५६ जणांना दुसरा डोस देण्यात आला.

मुंबईत आतापर्यंत २९ लाख ६ हजार ९२, पुण्यात २६ लाख ४ हजार ५४६ , ठाण्यात १४ लाख ९४ हजार ७६१, नागपूरमध्ये ११ लाख ७९ हजार ६५, नाशिकमध्ये ८ लाख ९१ हजार ८७ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

...................................

Web Title: So far more than 1 crore 97 lakh beneficiaries have been vaccinated in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.