Join us

कुर्ल्यात झोपडपट्टीला आग; आठ झोपड्या जळून खाक, जीवितहानी नाही

By सीमा महांगडे | Updated: September 8, 2023 16:44 IST

कुर्ला येथील कुरेशी नगर परिसरातील काही झोपड्यांना शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली.

मुंबई : कुर्ला येथील कुरेशी नगर परिसरातील काही झोपड्यांना शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही मात्र आगीत आठ झोपड्या जळून खाक झाल्या.

कुर्ला – माहुल रेल्वे रुळालगत झोपडपट्टी उभी राहिली असून या झोपडपट्टीतील काही झोपड्यांना शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली. स्थानिक रहिवाशांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र आग अधिकच भडकत गेली. काही नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत अन्य काही झोपड्यांपर्यंत आग पसरली. 

अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या आगीत आठ झोपड्या जळून खाक झाल्या. अखेर दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. 

टॅग्स :मुंबईकुर्लाआग