Slides have higher levels of antibodies than buildings | इमारतींपेक्षा झोपडपट्ट्यांमध्ये अँटीबॉडीजचे प्रमाण अधिक, सेरो सर्वेक्षणाच्या दुस-या फेरीचा अहवाल

इमारतींपेक्षा झोपडपट्ट्यांमध्ये अँटीबॉडीजचे प्रमाण अधिक, सेरो सर्वेक्षणाच्या दुस-या फेरीचा अहवाल

मुंबई - चाळी व झोपडपट्टीमधील नागरिकांमध्ये सरासरी ४५ टक्के व इमारतींमध्ये सुमारे १८ टक्के अँटीबॉडीज तयार झाले असल्याचे दुसऱ्या सेरो सर्वेक्षणातून उजेडात आले आहे. आर उत्तर - दहिसर, एम पश्चिम - चेंबूर आणि एफ उत्तर - सायन वडाळा या तीन विभागांमधील झोपडपट्टी आणि इमारतींमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते. पहिल्या फेरीत तीनही विभागांतील सर्व वयोगटांमध्ये समान प्राबल्य असल्याचे आढळले होते. मात्र दुस-या फेरीत हे प्राबल्य ४० पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये काही प्रमाणात अधिक असल्याचे आढळून आले आहे.

सर्वेक्षणासाठी संबंधित तीन विभागातील काही रहिवाशांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. हे सर्वेक्षण नीती आयोग, महापालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या अभ्यासात कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट सहयोगी संस्था म्हणून सहभागी आहेत. सर्वेक्षणाची पहिली फेरी जुलै अखेरीस घेण्यात आली होती. 

पहिल्या फेरीतील सर्वेक्षणादरम्यान झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये १६ टक्के ऍन्टीेबॉडीज प्राबल्य आढळून आले होते. सप्टेंबर अखेरीस करण्यात आलेल्या दुस-या फेरीत पाच हजार ८४० एवढया लक्ष्य नमुन्यांपैकी पाच हजार ३८४ नमूने संकलित करण्यात आले. यामध्ये लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता. तसेच संस्थात्माक विलगीकरणात असलेल्या आणि सक्रीय प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना या अभ्यासातून वगळण्यात आले. 

महत्वाची निरीक्षणे व निष्कर्ष...

* सर्वेक्षणाच्या दोन्ही फे-यांदरम्यान हेल्थ पोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय आणि क्षेत्रस्तरावर काम करणाऱया व्यक्तिंमध्ये सरासरी २७ टक्के ऍन्टीबॉडीज आढळून आले.

* झोपडपट्टी परिसरातील नमून्यांमध्ये आढळून आलेले ऍन्टी बॉडीजचे प्राबल्य आणि बाधित रुग्णांच्या संख्येचा अभ्यास केल्यास झोपडपट्टी परिसरातील संसर्गात काही प्रमाणात घट झाली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Slides have higher levels of antibodies than buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.