दहिसरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 20:17 IST2021-06-05T20:04:18+5:302021-06-05T20:17:41+5:30

इमारतीचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या व स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी लोकमतला याबाबतची माहिती दिली.

Slab of building collapses in Dahisar, evacuation of civilians | दहिसरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, नागरिकांचे स्थलांतर

दहिसरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, नागरिकांचे स्थलांतर

ठळक मुद्देइमारतीचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या व स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी लोकमतला याबाबतची माहिती दिली.

मुंबई - दहिसर प्रभाग क्रमांक ७ मधील लिंक रोडवरील भक्ती पॅलेस या इमारतीच्या एका घराच्या हॉलचा स्लॅब आज पहाटे खालच्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशाचा घरात कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या धोकादायक असलेल्या इमारतीतील 19 नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. 

इमारतीचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या व स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी लोकमतला याबाबतची माहिती दिली. सदर घटनेची माहिती मिळताच शिवसेना विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांच्यासह भक्ती पॅलेस येथे भेट दिली, अशी माहिती त्यांनी दिली. तर सदर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात येत आहे. परिमंडळ ७ चे उपायुक्त विश्वास शंकरवार तसेच इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.
 

Web Title: Slab of building collapses in Dahisar, evacuation of civilians