Dharavi fire: धारावीत अग्नितांडव, फर्निचर गोदाम खाक; ६ जण जखमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 11:21 IST2024-05-28T11:20:34+5:302024-05-28T11:21:05+5:30

Mumbai dharavi fire: मुंबईतील धारावी भागात एका फर्निचर गोदामाला मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.

Six injured as fire breaks out in Mumbai Dharavi | Dharavi fire: धारावीत अग्नितांडव, फर्निचर गोदाम खाक; ६ जण जखमी!

Dharavi fire: धारावीत अग्नितांडव, फर्निचर गोदाम खाक; ६ जण जखमी!

मुंबई

मुंबईतील धारावी भागात एका फर्निचर गोदामाला मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. गोदामामध्ये लाकडी सामान असल्यानं आग झपाट्याने पसरली. आगीत ६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

धारावीच्या ९० फीट रोडवर अशोक मिल कंम्पाऊंडमधील एका तीन मजली गाळ्यात आग लागली. इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्थानिकांनी तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण केलं. शर्थीच्या प्रयत्नांनंतर सकाळी ८ वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

जखमींची नावे पुढीलप्रमाणे-
सलमान खान (२६), मनोज (२६), अमजद (२२), सलालुद्दीन (२८), सैदुल रेहमान (२६), रफीक अहमद (२६)

Web Title: Six injured as fire breaks out in Mumbai Dharavi