लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून आरोपीने धारावीतील पुनावाला चाळ येथील एका गारमेंट कारखान्यात २३ वर्षीय तरुणाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत साहिल दिनेशकुमार शर्मा (२२) याला अटक केली आहे.
अरमान शहा (२३) असे मृताचे नाव असून, तो पुनावाला चाळ येथील एका कारखान्यात काम करत होता. त्याचे शर्माच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास शर्मा हा अरमान काम करत असलेल्या कारखान्यात आला. त्याने अरमानशी बोलण्याचा बहाणा करत खिशातून मिरची पावडर काढून त्याच्या डोळ्यात फेकली. त्यानंतर, जवळील चाकूने त्याच्या पोटावर वार केले. मदतीसाठी पुढे आलेल्या कारखाना मालक अश्रफ मोहम्मद मतीन शेख (३८) यांच्यावर देखील हल्ला चढवला. यात शहाचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला. घटनेची वर्दी लागताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
आरोपी जाळ्यातआरोपी कोणताही मोबाइल फोन वापरत नसल्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी गुप्त बातमीदारांची मदत घेऊन त्याचा शोध घेतला. गुन्हे शाखेच्या कक्ष ५ चे पोलिस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला राजीव गांधी नगर परिसरातून ताब्यात घेतले.
Web Summary : In Dharavi, a 23-year-old was murdered in a garment factory due to a love affair with the suspect's sister. The accused, Sahil Sharma, 22, was arrested swiftly. The victim, Arman Shah, was attacked with chili powder and stabbed. The factory owner was also injured.
Web Summary : धारावी में एक गारमेंट फैक्ट्री में एक युवक की हत्या उसकी बहन के साथ प्रेम संबंध के कारण हुई। आरोपी साहिल शर्मा, 22, को तुरंत गिरफ्तार कर लिया गया। पीड़ित अरमान शाह पर मिर्च पाउडर से हमला किया गया और चाकू मारा गया। फैक्ट्री मालिक भी घायल।