अमृता फडणवीसांबद्दल गायिकेची गलिच्छ टीका; ठाकरेंच्या महिला नेत्या मैदानात, थेट सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:40 IST2026-01-27T12:36:17+5:302026-01-27T12:40:07+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर खालची पातळी गाठत टीका केली, या टीकेवरून आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे.

Singer's dirty criticism of Amrita Fadnavis; Thackeray's female leaders in the field, directly heard | अमृता फडणवीसांबद्दल गायिकेची गलिच्छ टीका; ठाकरेंच्या महिला नेत्या मैदानात, थेट सुनावले

अमृता फडणवीसांबद्दल गायिकेची गलिच्छ टीका; ठाकरेंच्या महिला नेत्या मैदानात, थेट सुनावले

गायिका अंजली भारती हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल गलिच्छ टीका केली. यानंतर त्या टीकेची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, आता राजकीय वर्तुळातून टीका सुरू आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी निषेध व्यक्त केला आहे. 

“बाबासाहेबांचे नाव अनावधानाने राहिले असेल, पण आता एवढे कशासाठी?”; गिरीश महाजनांचा थेट सवाल

गायिका अंजली भारती हिने एका कार्यक्रमात बलात्काराच्या संदर्भात विधान करताना अत्यंत खालच्या स्तराला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल धक्कादायक विधान केले आहे. 

"सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या पत्नी अमृता फडणवीस जी यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ भाषेत गायिका अंजली भारती यांनी जे वक्तव्य केलेले आहे, त्या वक्तव्यांचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडीकडून गायिका अंजली भारती यांचा निषेध करते", अशी पोस्ट ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. 

चित्रा वाघ यांनी कारवाईची केली मागणी

"आताच मी अंजली भारती यांचा एक व्हिडीओ बघितला. तळपायाची आग मस्तकात गेली, राजकीय विरोध असू शकतो पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत गलिच्छ बोलणे ते सुद्धा एका बाईने. अंजली भारती या बाईची किव करावी तेवढी कमी आहे. अंजली भारतीवर आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. 

'श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या-पैसे? हे समाजाच्या अधःपतनाचं भयावह चित्र आहे. पण आपल्याकडे श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा ते आम्हाला माहिती आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

Web Title : अमृता फडणवीस पर गायिका की अभद्र टिप्पणी, राजनीतिक आक्रोश भड़का।

Web Summary : गायिका अंजलि भारती की देवेंद्र फडणवीस की पत्नी अमृता फडणवीस पर अपमानजनक टिप्पणी की कड़ी निंदा हुई है। ठाकरे समूह की किशोरी पेडणेकर और चित्रा वाघ ने विरोध जताया और भारती और कार्यक्रम आयोजकों के खिलाफ कार्रवाई की मांग की।

Web Title : Singer's vulgar remarks about Amruta Fadnavis spark political outrage.

Web Summary : Singer Anjali Bharti's derogatory comments about Amruta Fadnavis, wife of Devendra Fadnavis, have drawn strong condemnation. Kishori Pednekar from the Thackeray group and Chitra Wagh have protested, demanding action against Bharti and the event organizers.