Join us

‘एकला चलो रे’च्या निर्णयावर मौन; वर्षा गायकवाड सर्वांना सोबत घेऊन जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 06:19 IST

वर्षा गायकवाड या मुंबई अध्यक्षा झाल्यानंतर भूमिका बदलल्याचे पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :काँग्रेस मुंबई अध्यक्षपदावरील नियुक्तीपासून भाई जगताप यांनी ‘एकला चलो रे’चा दिला होता. मात्र, त्यांच्या जागी वर्षा गायकवाड या मुंबई अध्यक्षा झाल्यानंतर भूमिका बदलल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेतील ‘एकला चलो रे’बाबत आता बोलणार नाही, योग्य वेळी बोलेन. सध्या पक्ष संघटन मजबूत करण्यावरच भर देणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

अध्यक्षपदी निवड झाल्याबाबत त्यांनी भूमिका मांडली. राष्ट्रवादीने शिवसेनेसाेबत महापालिका निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला असताना काँग्रेसचा निर्णय ‘एकला चलो’ असाच राहणार आहे का, असा सवाल केला असता त्या म्हणाल्या, आम्ही ‘एकला चलो रे’ जाणार की नाही? यावर आता बोलणार नाही, तर येत्या काळात यावर बोलू.  निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे आणि त्यांचा सन्मान झाला पाहिजे.

- वसतिगृहांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा फक्त घेऊन चालणार नसून तेथील सुरक्षेसंदर्भात कठोर पावले उचलण्याची गरज आहे. राज्यात महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात महिला मंत्री व्हाव्यात, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. 

- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक बांधीलकी वारसा जपण्याचे काम करते, जातीपातीचे राजकारण न करता महिलांना संधी देण्याचे काम पक्षांकडून केले जात आहे. 

- राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

 

 

टॅग्स :वर्षा गायकवाडकाँग्रेस