सिग्नल बिघाडाने मरे विस्कळीत

By Admin | Updated: March 15, 2015 00:57 IST2015-03-15T00:57:33+5:302015-03-15T00:57:33+5:30

शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुलुंड रेल्वे स्थानक येथे चार सिग्नल यंत्रणांमध्ये झालेल्या बिघाडाने मध्य रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाली होती.

Signal fatal disorder undead | सिग्नल बिघाडाने मरे विस्कळीत

सिग्नल बिघाडाने मरे विस्कळीत

मुंबई : शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुलुंड रेल्वे स्थानक येथे चार सिग्नल यंत्रणांमध्ये झालेल्या बिघाडाने मध्य रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाली होती. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे या रेल्वे मार्गावरील सर्व लोकल पंधरा ते वीस मिनिटे विलंबाने धावत होत्या. घरी परतण्याच्या वेळेला झाल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणा पूर्ववत झाल्याने रेल्वे सेवा सुरळीत झाल्याचे मध्य रेल्वेच्या नियंत्रण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Signal fatal disorder undead