Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kirit Somaiya: 'खुर्चीसाठी धर्म विकला, ते कसला राजीनामा देतात', किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 16:57 IST

Kirit Somaiya: ''उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला चिकटून बसले आहेत. भविष्यात आपले घोटाळेही बाहेर येतील आणि आपल्या राजीनाम्याची मागणी होईल, याची जाणीव ठाकरेंना होती.''

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांचे मेव्हुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर ईडीने कारवाई केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. ईडीने ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्ट, साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लि.च्या 11 सदनिका ताब्यात घेतल्या आहेत. या कारवाईनंतर भाजपच्या नेत्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनीदखील बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

'...म्हणून मलिकांचा राजीनामा घेतला नाही'बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, ''उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी आयुष्य आणि धर्मही विकला. त्यामुळे कितीही आरोप झाले तरी ते आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला चिकटून बसले आहेत. भविष्यात आपले घोटाळेही बाहेर येतील आणि आपल्या राजीनाम्याची मागणी होईल, याची जाणीव ठाकरेंना होती. त्यामुळेच त्यांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही'', अशी टीका सोमय्या यांनी केली.

'आमची लढाई सरकार पाडण्यासाठी नाही'ते पुढे म्हणाले, ''देशद्रोह्यांना टेरर फंडिग करणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण महाराष्ट्राची जनता हे चालू देणार नाही. आमची लढाई ही सरकार पाडण्यासाठी किंवा कोणाचा राजीनामा घेण्यासाठी नाही. तर भाजपची लढाई ही महाराष्ट्राला घोटाळेबाजांपासून मुक्त करण्यासाठी आहे'', असेही सोमय्या म्हणाले.

'शिवसेना नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार'ते पुढे म्हणतात, ''उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यामध्ये जमिनीचा व्यवहार आहे, हे मी आधीपासून सांगत होतो. मात्र, तेव्हा माफीया सेनेचे लोक माझ्यावर हल्ला करत होते. हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीसोबत उद्धव ठाकरेंचे संबंध काय आहेत, ठाकरे कुटुंबाने उभी केलेली एक कंपनी नंदकिशोर चतुर्वेदींना कशी गेली? हे त्यांनीच सांगावे, म्हणजे ईडीला आणि इतर तपास यंत्रणांना जास्त मेहनत करावी लागणार नाही. येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या सहा नेत्यांचे घोटाळे मी लवकरच बाहेर काढणार,'' असा इशाराही किरीट सोमय्या यांनी यावळी दिला.

संबंधित बातमी:- आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंचीही चौकशी होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ

टॅग्स :किरीट सोमय्याउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा