न्यू दिंडोशी म्हाडा येथील श्री समर्थ फेडरेशनने सोसायटीच्या कार्यालयांचे रूपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 07:40 PM2020-07-08T19:40:38+5:302020-07-08T19:40:44+5:30

सध्या या सोसायटीत आजपर्यंत 16 कोरोना रुग्ण आढळले असून यातील काही रुग्ण येथील विलगीकरण कक्षाचा लाभ घेत आहे.

Shri Samarth Federation at New Dindoshi Mhada transforms the Society's offices into a quarantine center | न्यू दिंडोशी म्हाडा येथील श्री समर्थ फेडरेशनने सोसायटीच्या कार्यालयांचे रूपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये

न्यू दिंडोशी म्हाडा येथील श्री समर्थ फेडरेशनने सोसायटीच्या कार्यालयांचे रूपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : बऱ्याच ठिकाणी सोसायटीच्या मनमानी कारभाराची उदाहरणे समोर येत असतांना गोरेगाव ( पूर्व) नागरी निवारा 1 व 2 जवळील दिंडोशी स्थित म्हाडा वसाहत क्रं. २-३ मधील 'श्री समर्थ फेडरेशन' ने सोसायटी कार्यालयांचे 'विलगीकरण कक्षा' मध्ये रूपांतर करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे.

कोरोनाच्या भयावह काळात सगळीकडेच सोयी सुविधांचा अभाव असताना आणि खाजगी रुग्णांलयांची लाखोंची बिले मध्यमवर्गीय नागरिकांना परवडत नसतांना,'श्री समर्थ फेडरेशन' ने आपल्या जागेचा चांगला उपयोग करून सुरु केलेल्या या अभिनव उपक्रमाची सर्वच स्तरातून व सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे.

सध्या या सोसायटीत आजपर्यंत 16 कोरोना रुग्ण आढळले असून यातील काही रुग्ण येथील विलगीकरण कक्षाचा लाभ घेत आहे.या गृहनिर्माण सोसायटीत 10 इमारतीत 310 सदस्य राहतात.एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असंतांना आपल्या सोसायटीत 10 इमारतीत गरजू कोरोना बाधीत सदस्यांना चांगले उपचार  व त्यांना आराम व घरचे सकस अन्न मिळून त्यांना लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी न्यू दिंडोशी म्हाडा येथील इमारत क्रमांक 2 व 3 येथील श्री समर्थ फेडरेशनने चक्क सोसायटीच्या कार्यालयाचे क्वारंटाईन सेंटर मध्ये रूपांतर केले आहे.

येथील 10 फूट बाय 10 फूट अश्या छोट्या जागेचा चांगला उपयोग करून या सोसायटीतील 10 कार्यालयाचे रूपांतर  क्वारंटाईन सेंटर मध्ये केले आहे.या ठिकाणी 1 बेड,पाणी गरम करण्यासाठी इलेक्ट्रिक भांडे,तसेच शौचालय व बाथरूमची देखिल सुविधा आहे. आणि विशेष म्हणजे या सोसायटीचे 2 रिकामे फ्लॅट देखिल क्वारंटाईन सेंटर साठी त्यांनी उपयोगात आणले आहे.तर शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,दिंडोशीचे स्थानिक आमदार सुनील प्रभू व मुंबईचे उपमहापौर व प्रभाग क्रमांक 40 चे स्थानिक नगरसेवक अँड.सुहास वाडकर यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याची माहिती त्यांनी दिली.

अश्या प्रकारे सोसायटीच्या कार्यालयाच्या छोट्या जागेचा उपयोग क्वारंटाईन सेंटर उभारणी ही मुंबईतील पहिली गृहनिर्माण सोसायटी आहे.सदर संकल्पना यशस्वीपणे राबवणारे श्री समर्थ फेडरेशनचे अध्यक्ष व कला दिग्दर्शक सुनील थळे व सचिव 
प्रकाश येजरे यांची आहे.आमची सोसायटी मुजोर नाही तर मेहेरबान सोसायटी आहे असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

श्री समर्थ फेडरेशनच्या आवारातील १० सोसायटी कार्यालयांचे संपूर्णपणे सॅनिटायझेशन करून 'विलगीकरण कक्ष' मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. संशयित रुग्णांची कोरोना चाचणी होऊन तो इस्पितळात किंवा क्वारंटाईन सेंटर मध्ये जाईपर्यंत बराच कालावधी जातो, या काळात त्याच्या परिवाराला किंव्हा इतर कोणालाही संसर्ग होऊ नये म्हणून रुग्णांसाठी या तात्पुरत्या विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. तसेच या काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून  सुनील थळे यांनी स्वेच्छेने १० बेड उपलब्ध करून दिले आहेत, तर  त्रिलोकनाथ पांडे यांनी रुग्णांसाठी मास्क आणि स्वच्छ गरम पिण्याच्या पाण्यासाठी इलेक्ट्रिक हिटर उपलब्ध करून दिले आहेत अशी माहिती फेडरेशनचे खजिनदार किशोर दाबेलकर यांनी शेवटी सांगितले.

Web Title: Shri Samarth Federation at New Dindoshi Mhada transforms the Society's offices into a quarantine center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.